पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी किशोर भाऊसाहेब गांगर्डे तर व्हाईस चेअरमन पदी दीपक किसन वाघ यांची बिनविरोध निवड

संस्थेमार्फत कल्याणकारी व सभासदाचे हिताच्या योजना राबवण्याचा मानस - चेअरमन किशोर गांगडे, व्हॉ.चेअरमन दीपक वाघ

। अहमदनगर । दि.28 मार्च ।  पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी किशोर भाऊसाहेब गांगर्डे व व्हाईस चेअरमन पदी दीपक किसन वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची कामधेनू असलेल्या सुमारे १६५८ सभासद असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये चेअरमन वॉईस चेअरमन पदी निवड करण्यात आली. 

संचालक मंडळाच्या सभेत जिल्हा उपनिबंधक अहमदनगर या कार्यालयाचे प्रतिनिधी ए.ए.शेख उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या मुख्यालयासह पाच शाखा असून शाखा संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून पाच शाखा कार्यान्वित आहेत. संस्थेचे स्वतःचे रू ७.१८ कोटीचे भाग भांडवल आहे, संस्थेकडे रू.२९.६० कोटीच्या संचित ठेवी असून ८४.३१ कोटी मुदत ठेवी आहे सभासदांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी संस्थेने रू.८०.७९ कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून होणाऱ्या पतपुरवठ्याच्या व्याजदरापेक्षा कमी दराने म्हणजे ९०००००/- पर्यंत ८%,१२०००००/- पर्यंत ९%, १५०००००/- पर्यंत १०% व्याज दराने कर्ज पुरवठा करणारी ही जिल्ह्यात एकमेव पतसंस्था ठरली आहे. यामध्ये नूतन संचालक मंडळ दत्तात्रेय आवारी, सुरेश ढोंमसे, अशोक राशिनकर, गणेश कवडे पाटील, देविदास शेटे, रवींद्र यादव, संदीप शेरकर, संतोष जायभाय, रामदास पालवे, संदीप पवार, जगदीश वाघ, अरविंद वाव्हळ, सौ.अमृता पोळ, संभाजी निमसे, विशाल सरोदे, सौ.अर्चना गायकवाड, सौ.प्रियांका मिसाळ, महेश भावसार, किशोर सांगळे आदींची निवड झाली आहे. 

या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी दत्तात्रेय गडाख, भानुदास कलापुरे, झुंजारक तात्या, बाळकृष्ण काळे, सर्जेराव ठोंबरे, सयाजीराव वाव्हळ, राजेंद्र परदेशी, बाळासाहेब गाडे, भाऊसाहेब म्हसे, इस्लाम शेख, शांताराम आवारे, संजय गायके यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. तसेच पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्यामधील कर्मचाऱ्यांची पंढरी असलेल्या या संस्थेमार्फत यापुढेही कल्याणकारी व सभासदाच्या हिताच्या योजना राबवण्याचा मानस असल्याचे नूतन चेअरमन किशोर गांगर्डे व व्हाईस चेअरमन दीपक वाघ यांनी सांगितले व यावेळी संस्थेचे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर हळगावकर व इतर कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post