डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडा टाकणार्‍यास अटक


। अहमदनगर । दि.03 जून 2022 । नगर-सोलापूर रोडवरील हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याकडील 67 हजार 500 रुपये बळजबरीने चोरून नेणार्‍या सहाजणांपैकी एका आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अटक केली.

सुधीर बाबासाहेब सायंबर (वय 30 राहणार पारोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सोलापूर हायवेवर रघुनाथ एकनाथ मेटे यांचे हॉटेल असून सहाजणांनी हॉटेलवर येऊन त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 67 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत नगर तालुका पोलिस ठाणे गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक तपासाच्या मदतीने सर्व आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी सुधीर सायंबर याला बुधवारी दि 1 जून रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दिनांक 4 पर्यंत  पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल भालसिंग, पोलीस कॉन्स्टेबल साठे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post