राज्यात जून महिन्यामध्ये पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

। मुंबई । दि.05 जून 2022 । राज्यात जून महिन्यामध्ये पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच यंदा मान्सून सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यावर्षात साधारण 96 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

राज्यातील अनेक भागांमध्ये सात जूननंतर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पावसाची प्रतिक्षा लांबली आहे.

दरम्यान, जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असून खंड पडण्याची देखील शक्यता आहे. तसेच जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

राज्यात 84 ठिकाणी नोंदविण्यात आलेले कमाल आणि किमान तापमान, वातारणातील आर्द्रता ताशी वाऱ्याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या काही घटकांचा अभ्यास केल्यानंतर पुढील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

------------------

वाढत्या कोरोनामुळे मास्क वापरण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन ; मास्कसक्ती नसल्याचाही खुलासा

राज्यात ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार 

व‍िशेष श‍िबीरात ६५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप 

श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन 

Post a Comment

Previous Post Next Post