ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या श्री विशाल गणेशाची आरती

 ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या श्री विशाल गणेशाची आरती

श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने आत्मिक समाधान-अनुराधा पौडवाल

। अहमदनगर । दि.30 मे 2022 ।  श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे, प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पुजनाने होते. अनेक रुपात श्री गणेशाचे आपण सर्वजण पुजन करतो. नगरचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेशाची भव्य मूर्ती पाहूनच आत्मिक समाधान मिळते. 

मंदिराचा झालेले जिर्णोद्धार सुबक आणि देखणा असाच झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रसन्नता लाभते. या श्री विशालाची प्रचिती ऐकून होते, आज दर्शनाने मोठे समाधान मिळाले असल्याचे ज्येष्ठ गायिक अनुराधा पौडवाल यांनी सांगितले.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट देऊन आरती केली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे,  , प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड, अनिल रामदासी अदि उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष अभय आगरकर यांनी मंदिराच्या झालेल्या कामाची व राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन देवस्थानाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. प्रास्तविकात देवस्थानच्यावतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post