सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला ; चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद


। अहमदनगर । दि.17 एप्रिल ।  अपार्टमेंटमधील घरांना बाहेरुन कड्या लावत चोरट्यानी धूमाकूळ घातला. ही घटना शनिवारी पाहाटेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर घडली.

चोरट्यांनी उत्कर्ष अपार्टमेंटमधील एका घरात चोरी करीत 2 लाख 25 हजाराचा ऐवज चोरुन नेला. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले आहेत.

अविनाश बाबुराव सपकाळ (वय 52, रा.बी.विंग, उत्कर्ष अपार्टमेंट, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि.15 मे रोजी रात्री साडेदहा वाजता सपकाळ यांची पत्नी व मुलगी घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते.

तसेच सपकाळ हे त्यांच्या भावाच्या प्लॅटमध्ये गेले होते. दि.16 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सपकाळ यांच्या शेजारी राहणारे करण ढापसे यांच्या घराला कोणीतरी बाहेरुन कडी लावल्याने त्यांनी वॉचमन शिवाजी बोठै व सरुबाई बोठे यांना आवाज दिला.

त्यावेळी सरुबाई बोठे त्यांनी त्यांच्या घराला लावलेली कडी काढली. त्यावेळी अन्य घरांनाही कड्या लावलेल्या दिसल्या, त्यांनी त्या काढल्या यावेळी सपकाळ यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यांनी सपकाळ यांना बोलावले. सपकाळ यांनी तेथे जाऊन पाहिले असता, घराला कुलूप दिसले नाही. घरात जाऊन पाहिले त्यावेळी लाकडी कपाटातील कपड्यांची उचकापाचक केलली दिसली.

कपाटात ठेवलेली 2 लाख 15 हजाराची रक्कम आढळून आली नाही. चोरट्यांनी या रकमेसह मिनी गंठण, टॉप्स, असा एकूण 2 लाख 25 हजाराचा ऐवज चोरुन नेला, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

---------------

खालील बातम्या देखील वाचा...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज 

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी घोषित 

अहिल्यादेवी यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी : राज्यपाल 


Post a Comment

Previous Post Next Post