। अहमदनगर । दि.16 एप्रिल । येथील ह्युम मेमोरियल चर्चेमध्ये उत्तम शुक्रवारनिमित्त (गुड फ्रायडे) विशेष मोठी भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम शुक्रवारची भक्ती मोठया सभासदांच्या उपस्थितीत झाली.
ह्युम मेमोरियल चर्चमध्ये उत्तम शुक्रवार निमित्त आयोजित मोठया भक्तीसाठी जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने ़िख्रस्ती लोक समुदाय उपस्थित होता. यावेळी चर्चमध्ये पवित्र बायबलमधून प्रवचन देण्यासाठी रेव्ह. ललीत साळवे (पुणे) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रुसावरील सप्तोदगार यावर त्यांनी संदेश दिला. ख्रिस्ताचे क्रुसावरील मरणाचे महत्व समजावून सांगितले. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे चालतात, त्यांना स्वर्गीय राज्य प्राप्त होते.
प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानव जातीसाठी आपले बलिदान दिले. येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे संपूर्ण मानवजातीला तारणाचा व स्वर्गाच्या राज्याचा मार्ग प्राप्त झाला, असे त्यांनी सांगितले. चर्चेचे सचिव जॉन्सन शेक्सपिअर यांनी स्वागत केले.
संदेशावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, मानवाने सध्याच्या परिस्थितीत आहे, त्या स्थितीमध्ये आनंदी राहावे व एकमेकांवर प्रिती करावी. कोणाचाही द्वेष, हेवा वा कोणाशीही स्पर्धा न करता प्रत्येकाशी प्रेमाने व सहकार्याने वागावे, असे त्यांनी सांगितले.
या भक्तीच्या अध्यक्षस्थानी चर्चेचे मुख्य धर्मगुरू रेव्हरंड पी. जी. मकासरे होते. तर भक्तीचे संचलन रेव्ह. विद्यासागर भोसले यांनी केले. या भक्तीची व्यवस्था ह्युम मेमोरियल चर्चेचे कार्यकारिणी सदस्य खजिनदार एन. बी. जाधव,
सहायक सचिव मिलिंद भिंगारदिवे, महेंद्र भोसले, संतोष जाधव, फ्रँक्लिन शेक्सपिअर, शामराव भिंगारदिवे, विजय अंधारे, ऑल्विन शेक्सपिअर, वसंत कांबळे, राजेश चाबुकस्वार, सॅम्युएल तिजोरे, संदीप पारधे, अॅड. अनिल अंधारे, वैभव वाघमारे आदींनी केले.
दरम्यान, कोठी येथे दयासागर मित्र मंडळाच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. यावेळी स्वप्नील शिंदेंसह अध्यक्ष गुडू शिंदे, पाध्यक्ष जेम्स शिंदे, खजिनदार किरण कांबळे, आकाश कोरे, तारुण शिंदे, राहुल मुक्तीकर, विपुल पवार, रोहित पोळ, रोहन शिंदे, सनी शिंदे, विजय देवडे, हर्षल केदारे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar