। अहमदनगर । दि.19 एप्रिल । रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून चोरुन नेले. ही घटना सावेडी उपनगरातील रासनेनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
रेखा कंठाळे व त्यांच्यासोबत आणखी एकजण पायी जात असताना साडेनऊ वाजेच्या सुमारास आराधना संगीतालय, किंग्ज कॉर्नर, रासनेनगर येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी कंठाळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले.
या चोरट्यांनी अंगात काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीला एक बॅग होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी रेखा प्रकाश कंठाळे (वय 55 रा. अजिंक्य कॉलनी, बोरूडे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.
----------------------
खालील बातम्या देखील वाचा...
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
Tags:
Ahmednagar
