राष्ट्रीय डेअरी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मिल्क मशीनचे वाटप


। अहमदनगर । दि.29 एप्रिल । भारत सरकारच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणंद या संस्थेचे चेअरमन मिनेश शहा यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे चेअरमन मंगलजित राय,आनंद डेअरीचे चेअरमन शामल भाई पटेल,कार्यकारी संचालक के सी पटेल,गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. दुग्धव्यवसायात आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी आणि कमी श्रमात ज्यादा उत्पादन कसे मिळेल आणि या व्यवसायाची गोडी कशी लागेल यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आय.डी.एम.सी. प्रा.लि. उत्पादित बाईक माऊंटेबल मिल्कींग मशिनचा वापर करून शेतकऱयांना दूध काढण्यास मदत होणार आहे. दुचाकीवरून हे मशीन वाहून नेले जात आहे

.त्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते त्यामुळे कमी गायी, म्हशी असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील दूध संघांनी एकत्र येऊन  अमूल प्रमाणे कॉमन ब्रँड बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा शहा यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय डेअरी विकास संस्थेच्या संचालकांची बैठक घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post