। अहमदनगर । दि.26 एप्रिल । नगर एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषा गिरीष गायकवाड (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे.
सावेडी उपनगरातील गावडे मळ्यात ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनीषा गायकवाड हिने राहत्या घरी गळफास घेतल्याने तिला तिचा पती गिरीष गायकवाड याने रविवारी (दि.24) पहाटे तीन वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान मनीषा गायकवाड हिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नसून तोफखाना पोलिस पढील तपास करत आहेत.
Tags:
Ahmednagar
