। मुंबई । दि.14 एप्रिल । वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता एका आठवड्यात महाराष्ट्रात दोन वेळा सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ झाली आहे. आज सीएनजी ५ रुपयांनी, तर पीएनजी ४.५० रुपयांनी महागला. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी ७२ रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पाईप गॅस ४५ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर झाला आहे.
महानगर गॅसने आज सुधारित दर जाहीर केले. त्यात महाराष्ट्रातील सीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति किलो आणि पीएनजीच्या दरात ४ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर वाढ केली. गेल्या आठवड्यातही महानगर गॅसने दरवाढ केली होती.
६ एप्रिलला सीएनजी ७ रुपयांनी, तर पीएनजी ५ रुपयांनी महागला होता. म्हणजे आठवडाभरात सीएनजी १२ रुपयांनी आणि पीएनजी ९.५० रुपयांनी महागला आहे. या दरवाढीमुळे मुंबईत सीएनजी ७२ रुपये किलो आणि पीएनजी ४५ रुपये ५० पैसे घनमीटर झाला आहे.
--------------
सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ’अमृत जवान’ अभियान: भुसे
उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
