। अहमदनगर । दि.26 एप्रिल । मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटेला तब्बल साडेचार महिन्यानंतर मंगळवारी (दि.26 एप्रिल) तोफखाना पोलीसांनी अटक केली.
अटकपूर्व जामीनसाठी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मोकाटेला दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळला आहे.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याच्यावर महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याने अटकपूर्व जामीनसाठी जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न केले. तिन्ही कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे.
पोलिसांनी आरोपी मोकाटे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले, अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले.
Tags:
Crime
