। अहमदनगर । दि.18 एप्रिल । मुंबई,पुणे जिल्हासह अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड- श्रीगोंदा तालुक्यात खून आणि दरोड्याचा गुन्ह्यात फरार असणार्या कुख्यात भरत विठ्ठल एडके याला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
भरत विठ्ठल एडके हा सुपारी किलर असून त्याने शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर ठाणेकर यांची हत्या जामखेड बीड सरहद्दीवर केली होती. तसेच, पुणे येथील फैजल खान या बिल्डरला सुपारी घेऊन मारले होते.
बेलवंडी येथील आकाश मापारी हत्याकांड प्रकरणात त्याचा सहभाग होता. मीरा रोड, भाइंदर, पुणे व अहमदनगर येथे खुन, दरोड्यासह खुन, अपहरण, जबरी चोरी, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे असे 10 गंभीर गुन्हे नोंद आहेत.
मात्र, तो पोलिसांच्या हातावर तुरी करून फरार होता. नगरच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह साहाय्यक पोलीस निरीक्षक इन्कार मुंढे, सपोनि सुरेश इंगळे, साहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ,
संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, भीमराज खारसे, सुरेश माळी ,रवि सोनटक्के, यांना भरत एडके हा कोथरूड येथे असल्याचे माहिती कळताच त्यांनी सापळा रचून एडके यास ताब्यात घेतले आहे.
Tags:
Crime
