अरणगावात शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या दिवशी उभारली लोकसहभागाची गुढी

। अहमदनगर । दि.22 एप्रिल । नगर तालुक्यातील अरणगाव येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुलांना टोप्या व फुगे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने सात स्टॉल लावण्यात आले होते. 

बौद्धिक विकास, भाषिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास, गणनपूर्वतयारी,  विकास पत्र, प्रमाणपत्र यांचा सहभाग होता. सुरुवातीला संपूर्ण गावातून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व ढोल-ताशाच्या गजरात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली. नवगतांचे स्वागत करण्यात आले . 

सरपंच स्वातीताई गहिले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ फसले, उपाध्यक्ष स्वातीताई गहिले, माजी अध्यक्ष मोहन तात्या गहिले, लहू आजबे ,ज्ञानेश्वर पुंड, सुप्रिया पुंड, कल्पना जाधव, अंजुम सय्यद, प्रविण पुंड, संकेत पुंड, ग्रामपंचायत सदस्य  बंडू गहिले, बबन शिंदे, सागर कल्हापुरे, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत आनंदाच्या वातावरणात शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. 

यावेळी दाखल पात्र विद्यार्थिनी संस्कृती प्रवीण पुंड हिच्या आजीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तिच्या पालकांनी शाळेला पोषण आहार शिजवण्यासाठी बावीस लिटरचा कुकर भेट दिला. तसेच फैजल मुस्ताक सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी 10 घड्याळ भेट देण्यात आले. अशा प्रकारे लोकसहभागाची गुढी शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या दिवशी उभारण्यात आली. 

यावेळी शाळेतील शिक्षिका संगीता कदम, संगीता जाधव, ज्योती कदम, गिरीजा गारुडकर, भाग्यलक्ष्मी बडगू, कमल गवळी, संगीता शेळके, यांनी कागदी टोप्या तसेच विविध कागदी वस्तू स्टॉल मांडून सेल्फी पॉइंट तयार केला. मुख्याध्यापक श्रीम .लहाकर रेखा संभाजी यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post