कोविडमध्ये पालक गमावलेल्या बालकांना १० हजारांची मदत

। अहमदनगर । दि.24 मार्च । महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध झाला असून कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी १० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले. 

या योजनेसाठी पात्र लाभार्थी यांनी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय जव्हेरी यांच्याकडून अर्जाचा नमूना घेऊन आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावा. 

अर्थसहाय्य मिळण्याकरीता मूळ अर्ज, बालकांचे शाळेचे बोनाफाईड, आई/वडील कोविड पॉझिटीव्ह असल्याबाबतचा पुराव्याची छायाप्रत आई/वडील मृत्यू दाखला छायाप्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख (९९२१११२९११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post