। अहमदनगर । दि.19 मार्च । बारा ते अठरा वयोगटातील मुला-मुलींनी खांबावर व दोरीवर डोळ्यांचे पारणे फिटेल, अशी सुरेख प्रात्यक्षिके करून जिल्हास्तरीय निवड चाचणी मल्लखांब स्पर्धा गाजवली. या चार वयोगटातील जिल्हास्तरीय स्पर्धेत अर्णव खरे, पूर्ती मुके, सार्थ वाळुंजकर, मृण्मयी मुंगी, प्रतीक डावखरे, वृंदावनी सांगळे व साजरी परदेशी या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हा मल्लखांब संघटनेच्या या स्पर्धा पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर झाल्या. उद्घाटन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष अजित बोरा यांच्या उपस्थितीत झाले. पारितोषिक वितरण मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व माजी प्राचार्य खासेराव शितोळे, कल्पना भामरे, परेश पित्रोडा,
अॅड. अविनाश बुधवंत आणि ’हेल्पिंग हँडस् फॉर हंगर्स’ संस्थेचे अध्यक्ष नाना भोरे व संजय खोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तसेच सर्व सहभागींना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेकरिता पंच म्हणून होनाजी गोडळकर, अजित लोळगे, निलेश कुलकर्णी, अमित जिनसीवाले व ओंकार केसकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल असा- 12 वर्षाखालील मुले :अर्णव खरे (प्रथम), वेदांत गाढवे (द्वितीय) व मयुरेश ब्रम्हे (तृतीय). 12 वर्षाखालील मुली : पूर्ती मुके (प्रथम), अनन्या क्षीरसागर(द्वितीय) व धनश्री टापरे (तृतीय). 14 वर्षाखालील मुले : सार्थ वाळुंजकर (प्रथम), अविनाश ठाकूर (द्वितीय) व तनिष्क रासने (तृतीय). 14 वर्षाखालील मुली : मृण्मयी मुंगी (प्रथम), गौरव वाळुंजकर (द्वितीय) व अंकिता जाधव (तृतीय). 18 वर्षाखालील मुले: आर्यन गोयल (प्रथम), दीपक बेनकर (द्वितीय) व आदित्य मदने (तृतीय). 16 वर्षाखालील मुली : वृंदावनी सांगळे (प्रथम), उर्विजा धुळगंड (द्वितीय) व सप्तमी जाधव (तृतीय). 18 वर्षावरील मुले : प्रतीक डावखरे (प्रथम), रोनीत खुपसे (द्वितीय) व शत्रुघ्न जरे (तृतीय). 16 वर्षावरील मुली : साजरी परदेशी (प्रथम), सायली दळवी (द्वितीय) व वैष्णवी बांदल (तृतीय). स्पर्धेसाठी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, नंदेश शिंदे, मोहनीराज लहाडे, अनंत रिसे, अनिकेत सुसरे यांनी परिश्रम घेतले.