अहमदनगर जिल्हा ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन च्या अध्यक्षपदी लांडगे

अहमदनगर जिल्हा ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन च्या अध्यक्षपदी पांडुरंग लांडगे यांची निवड

। अहमदनगर । दि.19 मार्च । महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन ची नगर जिल्ह्याची बैठक संपन्न होऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी पांडुरंग लांडगे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदी संजय गोरे, सचिव पदी भानुदास वेताळ, सहसचिवपदी मुरलीधर देशमुख, खजिनदारपदी परशुराम कोतकर, सदस्यपदी नितीन डोंगरे व संतोष नायकवाड यांच्या  निवडीची घोषित करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष रामदास शिर्के, अध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त संजय घोलप, श्रीकांत चौगुले, बाळासाहेब वाघ, संजय वाणी ,सोमनाथ सोनवणे, दत्तात्रेय बोंबले, परशुराम कोतकर आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष पांडुरंग लाडगे म्हणाले की, नगर जिल्हा हा सहकार क्षेत्रातला राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहे. या संस्थांच्या बळकटीकरणासाठी लेखापरीक्षक काम करत आहेत अहमदनगर जिल्हा ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून लेखापरीक्षकांना एकत्रित करून संघटना वाढीसाठी काम करू याच बरोबर सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करू असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post