युवतीला त्रास देणार्‍या युवकावर गुन्हा दाखल


। अहमदनगर । दि.23 मार्च ।  गेल्या महिनाभरापासून सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा वारंवार पाठलाग करुन तिला त्रास देणार्‍या सारसनगर येथील युवकावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारसनगर परिसरातील भगवानबाबानगर मध्ये दोन महिन्यापुर्वी दादा अंबादास बडे हा राहण्यास आलेला आहे. तेव्हापासून त्याने शेजारी राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन युवतीला त्रास देण्यास सुरुवात केली. ’मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हणत 

तिचा वारंवार पाठलाग करत छेडछाड करू लागला तसेच तिचा विनयभंगही केला. या त्रासाला कंटाळून या युवतीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी दादा अंबादास बडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post