बीएसएनएलचे स्टेशन तोडून नुकसान

। अहमदनगर । दि.23 मार्च ।  नगर-पुणे महामार्गावर केडगाव येथील अंबिकानगर बसस्टॅण्डजवळ असलेले बीएसएनएल कंपनीचे कोअ‍ॅक्सिअल रिपिटर स्टेशन जेसीबीच्या सहाय्याने तोडून नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत बीएसएनएलचे उपमंडल अभियंता कमलेश हरी वैकर (रा. शाहूनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

केडगावच्या अंबिकानगर बसस्टॉप जवळ असलेल्या जलाराम बेकरी शेजारी बीएसएनएल कंपनीचे कोअ‍ॅक्सिअल रिपिटर स्टेशन आहे. या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने हे रिपीटर स्टेशन तोडून उदध्वस्त केले. पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबी चालकास जेसीबीसह ताब्यात घेतले. 

हा प्रकार संजय शिवाजी निमसे याच्या सांगण्यावरुन जेसीबी चालक सोमनाथ छबूराव रासकर याने केला असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी  संजय शिवाजी निमसे व जेसीबी चालक सोमनाथ बाबूराव रासकर या दोघांविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post