। अहमदनगर । दि.18 मार्च । नेवासा तालुक्यातील खाटकवाडी सुलतानपूर शिवार येथे राहणारी महिला सौ. रेखा शहाराम म्हस्के, त्यांची सासू म्हस्केबाई तसेच पती शहाराम म्हस्के यांना सामाईक विहिरीचे पाणी घेवू नये म्हणून
शेतात लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन शिवीगाळ करत, परत विहिरीवर दिसला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुमच्या एकाएकाचा काटा काढू अशी धमकी दिल्याची घटना घडली.
या प्रकरणी नेवासा पोलिसांनी सौ. रेखा शहाराम म्हस्के या महिलेच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे भाऊबंद सतीश बाबुराव म्हस्के, मीना सतीश म्हस्के (दोघे रा.खाटकवाडी, सुलतानपूर) यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार दहिफळे पुढील तपास करीत आहेत.
Tags:
Crime