मालिक यांचा राजीनामा नाही, मात्र कार्यभार इतर मंत्र्यांकडे


। मुंबई । दि.18 मार्च । कुर्ल्यातील विवादित जमीन खरेदी प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पण नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र त्यांच्याकडे असलेली जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

तर आज सकाळपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठका सुरू आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे मोजकेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.  प्रफुल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे,  छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे बैठकीत हजर आहे. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी नेत्यांची नावं आल्यानं पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post