मोटारसायकली चोरणार्‍या तिघांना साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह अटक


। अहमदनगर । दि.15 मार्च । येथील पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दहा चोरीच्या दुचाक्यांसह दोन मोबाईल असा सुमारे तीन लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त करीत असताना ज्ञानेश्वर शेड़ते याला संशयितरित्या दुचाकीवरुन फिरत असताना ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 


पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने त्याचे साथीदार ज्ञानेश्वर शांताराम मोरे (रा.भोकर, ता. श्रीरामपूर), लक्ष्मण दिलीप आहेर (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) व राम रमेश पोटे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांच्यासह अनेक चोर्‍या केल्याची कबुली पोलिसांनी आरोपी मोरे व आहेर यांना तात्काळ अटक केली. तर फरार राम रमेश पोटे यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल संजय दाणे (रा.नेवासा) यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी व अरुण तुकाराम डौले यांच्या मालकीची दुचाकी व अरुण तुकाराम डौले यांच्या मालकीची सप्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तीन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दहा चोरीच्या दुचाक्यांसह दोन मोबाईल असा

सुमारे तीन लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी अटक केलेले आरोपींविरोधात वाळुज, शनि शिंगणापूर, नेवासा पोलीस ठाणे व सोनई पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, समाधान भाटेवाल, कैलास साळवे, तुळशीराम गिते, अशोक कुदळे, किशोर काळे, अंबादास गिते, केवल रजपूत, सुमित करंजकर, आप्पासाहेब तांबे, राजेंद्र बिरदवडे यांच्यासह कुहाड व भवार यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post