। अहमदनगर । दि.17 मार्च । श्रीरामपूर शहरामधील वैभव लॉजमधील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदिप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणी दोन पिडीत महिलांची सुटका केलीअसून दोघांना ताब्यात घेतले आहे.
माहिती अशी की, गुरुवारी दि.17.मार्च रोजी श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदिप मिटके श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय (वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर) (लॉजमालक) हा हायप्रोफाइल महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे.
अशी खात्रीशिर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे मिटके यांनी श्रीरामपूर शहर विभागाचे पीआय सानप व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली.
तर आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय (वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर) ( लॉजमालक) व विश्वास रामप्रसाद खाडे (वय 26 रा कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्) या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
यातील आरोपीच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली, येथील डीवायएसपी संदीप मिटके, पीआय सानप,पीआय विठ्ठल पाटील, करमल, नितीन शिरसाठ, गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ आत्तार, सरग, गलांडे आदींनी केली.
Tags:
Breaking