आज 147 रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या 93 बाधितांची रुग्णसंख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के
। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । जिल्ह्यात आज 147 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 85 हजार 990 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 98.00 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 93 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 645 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 36 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 50 आणि अँटीजेन चाचणीत 07 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 09, अकोले 10, नगर ग्रा. 02, पारनेर 02, पाथर्डी 01, संगमनेर 05, शेवगाव 01, कॅंटोन्मेंट बोर्ड 01, इतर जिल्हा 01 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 02, कोपरगाव 27, राहता 18, राहुरी 01, संगमनेर 01 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 07 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 01, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 02 आणि संगमनेर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 20, कर्जत 05, कोपरगाव 31, नगर ग्रा 05, नेवासा 01, पारनेर 03, पाथर्डी 08, राहाता 43, राहुरी 06, संगमनेर 12, शेवगांव 03, श्रीरामपूर 03, कॅन्टोनमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या : 3,85,990
*उपचार सुरू असलेले रूग्ण : 645
*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7222
*एकूण रूग्ण संख्या : 3,93,857
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक 27 फेब्रुवारी, 2022
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
Tags:
Ahmednagar