। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहरबाबा नगरकेंद्रा मध्ये अवतार मेहरबाबांच्या 128 वा जन्मोत्सव कार्यक्रमात आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे 5 वा 7 वेळेस अवतार मेहेरबाबा कि जय म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी, उपाध्यक्ष वैभव जोशी, दीपक थाडे, राहुल मुळे, नितीन थाडे, मधुकर डाडर, नीलिमा औटी, माधुरी मिसाळ, डॉ प्रीती नाईक, आदी मोजके भाविक यावेळी उपस्थित होते.
यावर्षी अवतार मेहरबाबांच्या जन्मोत्सव कार्यक्रम कोविडमुळे हजारो मेहेरप्रेमींनी घरी साजरा केला तसेच या निमित होणारे 7 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत निवडक बाबाप्रेमींच्या उपस्थितीत जन्मोत्सव हा साजरा झाला व बाबाप्रेमींना ऑनलाईन पाहण्याची सोय करण्यात आली होती.
दरवर्षी सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून जन्मोत्सव सुरवात होत असे तर सात दिवस प्रवचन,भजन, आरती प्रार्थना,सुगमसंगीत गायन ,शास्त्रीय व भक्तीगीत गायन,पश्चिमात्य आणि इराणी बाबाप्रेमीचे गायन,वादन,अहमदनगर केंद्र व इतर बाबाप्रेमींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम,
कव्वाली गायन,भजने व अभंग वाणी तसेच नृत्य कार्यक्रम होत असत नगरसह देश विदेशातील भाविक दररोजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत हे सर्व कार्यक्रम गेली 2 वर्षे कोविड मुले झाले नाहीत यावर्षी ऑनलाईन फक्त 2 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
जन्मोत्सवात विविध भाविकांनी गीते, बाबाची भजने सादर केली तर मेहेरनाथ कलचुरी यांनी बाबाच्या कार्याविषयी, त्याचा आध्यत्मिक 5 गुरुविषयी व बाबाना पाहून साईबाबानी पर्वददिगार का म्हटले याची माहिती दिली.तसेच नगर सेंटर मध्ये उपासनी महाराजांनी बाबाचा वाढदीवस साजरा केला आदी माहिती दिली नंतर आरती प्रार्थाना करण्यात आली व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मेहेरबाद टेकडी (अरणगाव) येथील बाबाच्या समाधी ठिकाणी हि जन्मोत्सव संपन्न झाला, त्याठिकाणीही मोठ्या संखने भाविक उपस्थित होते, येणार आहे दि 26 फेबु ला संध्यकाळी नगर सेंटरला भजनाचा कार्यक्रम होणार असून तोही ऑनलाइन होणार आहे.
दि 27 फेबु ला मेहेराबाद येथेही समाधी जवळील मेहेर नजर बुक मध्ये सध्या 7 वा भजन व आरती व प्रार्थना कार्यक्रम होणार आहे यासाठी बाबाप्रेमींना उपस्थित राहता येईल तसेच हा व्हर्चुअल पद्धतीने ऑनलाईन पण पाहता येणार आहे.