कोरोना बाधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विशेष रजा मंजूर करावी : बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेची मागणी शिक्षणमंत्र्यांना निवेदन

। अहमदनगर । दि.15 जानेवारी । कोरोना महामारीच्या आपत्ती काळात कोरोना बाधित ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना विशेष रजा मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, महिला आघाडीप्रमुख वैशाली नाडकर्णी यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. आपण तिसर्या कोरोना लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना विशेष रजा मंजूर करावी. तसेच ज्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशा मुंबईसह इतर भागात दहावी, बारावीचे वर्ग ऑनलाइन घेण्याची शिक्षक परिषदेची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षणात सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलला प्रथम पारितोषिक

एप्रिल 2020 पासून अनेक शिक्षक कोरोना ड्युटीवर महाराष्ट्रभरात होते. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेतले, तर काहींना घरातच विलगीकरण राहून उपचार घेतले आहे. सध्या कोरोनाने अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित होताना दिसत आहे. शैक्षणिक वर्ष समाप्तीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. 

माजी सैनिकाची ऑनलाईनद्वारे झाली 18 लाखाची फसवणूक

शाळांमधून अर्जित रजा शिल्लक नसल्याचे कोरोनाग्रस्त शिक्षकांच्या विनावेतन रजा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधा झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर यांना रुग्णालयातील कालावधीसह घर विलगीकरण कालावधीच्या दरम्यान ची आवश्यकता ती विशेष कोरोना रजा देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे.

राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल 

Post a Comment

Previous Post Next Post