। अहमदनगर । दि.22 जानेवारी । भरधाव वेगात बेफिकिरीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल चालविल्याने मोटारसायकलच्या वेगावरील नियंत्रण सुटून मोटारसायकल (क्रमांक एमएच 20 डीएच 8934) खाली पडली.
या अपघातात सागर अशोक गाडेकर (वय 29, राहणार स्वामी समर्थ नगर, लाडगाव रोड, वैजापूर, औरंगाबाद) याचा मृत्यू झाला तर शुभम पाटील जखमी झाला. ही घटना कोपरगाव शिवारातील मुंबई-नगर रोडवर घडली.
याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी शुभम दिगंबर पाटील (वय 25, राहणार यशवंत कॉलनी, डेपो रोड, वैजापूर, औरंगाबादः यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकलस्वार सागर अशोक गाडेकर याच्याविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस हवालदार शेख करीत आहे.
Tags:
Ahmednagar