रविवारी शहारातील ३४ उपकेंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षा : परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

। अहमदनगर । दि.20 जानेवारी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही  रविवार, 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत अहमदनगर शहरातील 34 केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

 या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. 

यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी आदेशात स्पष्ट केले असून त्‍याबाबत त्‍यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post