चोरलेली कार चांदबिबी महालावर सापडली


। अहमदनगर । दि.15 जानेवारी । औरंगाबादच्या महिलेची खिस्तगल्ली येथे पार्किंग केलेली कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. ही कार चांदबिबी महाल परिसरात सापडली. कार सापडली मात्र चोरट्यांनी कारमधील 1 लाखाची रक्कम व दोन मोबाईलवर डल्ला मारला. ही घटना दि.12 रोजी दुपारी घडली.

अमिशा रिंकेश पटेल (रा. गुलमंडी नगरखाना, औरंगाबाद) असे संबंधित महिलेचे नाव असून त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांची गाडी खराब झाल्याने त्यांनी मानलेला भाऊ बालचंद रमेश मालपाणी यांची मारूती सुझुकी ब्रिझा (क्रमांक एमएच 20 ईवाय 9499) ही गाडी व त्यावरील चालक प्रशांत गणेश गायकवाड (रा. पोलघर, औरंगाबाद) असे कामानिमित्त औरंगाबाद येथून दि. 12 रोजी दीड वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाले.

दुपारी साडेचार वाजता नगर येथे आले असता कपडे खरेदी करण्यासाठी ही कार खिस्तगल्ली येथे पाकिर्ंंग केली. त्यानंतर परत कारजवळ आलो असता कार दिसली नाही. ती नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत चांदबिबी महालाजवळ मिळून आलेली आहे. कारमध्ये ठेवलेली पैशांची पर्स व दोन मोबाईल चोरी गेल्याचे दिसले.

Post a Comment

Previous Post Next Post