बेवारस मृताबाबत माहिती देण्याचे आवाहन

। अहमदनगर । दि.18 ऑक्टोबर । नगर शहरातील वाडिया पार्क बसस्थानकाजवळ आजारी अवस्थेत आढळून आलेल्या 48 वर्षीय अनोळखी व्यक्तीस पोलिसांनी औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मरण पावला. 

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली. ही घटना शनिवारी (दिनांक 16) घडली. मृत अनोळखी व्यक्तीचा रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे घारे, दात शाबूत, केस काळे-पांढरे, दाढी काळी-पांढरी वाढलेली, अंगात काळया रंगाची पँट, पांढर्‍या रंगाचा त्यावर चौकटी असलेला शर्ट घातलेला आहे.

या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 या फोनवर किंना पोलिस नाईक नितिन गाडगे (मोबाईल नंबर  8007209856) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post