। अहमदनगर । दि.28 सप्टेंबर । सोमवारी राहाता तालुक्यातील बाजार समितीत 5833 गोणी कांद्याची आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये कांद्याला 2150 रुपये भाव मिळाला आहे
कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1850 ते 2150 असा भाव मिळाला आहे. कांदा नंबर 2 ला 1500 ते 1800 असा भाव मिळाला आहे. कांदा नंबर 3 ला 550 ते 1450 रुपये इतका भाव मिळाला आहे.
तर गोल्टी कांदा 1400 ते 1700 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला आहे. गेल्या अनेक लिलावांच्या तुलनेत हा विक्रमी भाव मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
