साडेसहा हजार उमेदवारांची एमपीएससी परीक्षेला दांडी

। अहमदनगर । दि.05 सप्टेंबर । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही नगरच्या केंद्रावर शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेला 19 हजार 147 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सहा हजार 598 उमेदवार गैरहजर राहिले, अशी माहिती जिल्ह्याचे केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

जिल्ह्यात साठ उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक उमेदवारांची कोविड संदर्भात तपासणी केली. त्यात एकही उमेदवार कोविड बाधित आढळून आला नाही, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली. आज सकाळी 11 ते 12 यावेळेत ही परीक्षा पार पडली.

या परिक्षेसाठी जिल्ह्यात भरातून 19 हजार 146 उमेदवार बसले होते. त्यापैकी 12 हजार 567 उमेदवारांनी परीक्षा दिली. अन्य उमेदवार परीक्षेसाठी गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी समन्वय अधिकारी 15 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), भरारीपथक अधिकारी 3 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), उपकेंद्रप्रमुख 60 (वर्ग 1 चे अधिकारी),

सहाय्यक 60, पर्यवेक्षक 187, सहाय्यक कर्मचारी 79, समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक 18, समवेक्षक 798, लिपीक 60, केअर टेकर (शाळेचे) 53, बेलमन 53, शिपाई 78, पाणी वाटप कर्मचारी 196, वाहनचालक 78 या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post