। अहमदनगर । दि.05 सप्टेंबर । पोलिस असल्याचा बनाव करून दरोडा टाकणारा फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शोयब गुलाब कुरेशी (22, रा. वॉड नं. 2, श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव आहे. तो तीन महिन्यांपासून फरार होता.
श्रीधर जंगलू सोनवणे हे 27 मे 2021 रोजी पहाटे 6 वाजता आपल्या टेम्पोत लोखंड, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे असलेला हा भंगार माल घेऊन जात जात होते. नगरच्या दिशेने येत असताना शनिशिंगणापूर फाट्याजवळ कारमध्ये आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांचा टेम्पो अडवला.
पोलिस असल्याचे सांगत सोनवणे यांना कारमध्ये बसवले. वरवंडी गावाच्या शिवारात आल्यानंतर आरोपींनी सोनवणे यांचा टेम्पो भंगार मालासह चोरून नेला. याप्रकरणी राहुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी तो श्रीरामपूरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार कटके यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, शंकर चौधरी, रणजित जाधव, सागर ससाणे, बबन बेरड आदींनी आरोपीला ताब्यात घेतले.