पालकांच्या सहकार्याशिवाय शाळा सुरू करणे शक्य नाही : पोपटराव पवार

 शाळेचा शंभरावा दिवस साजरा


 । अहमदनगर । दि.28 सप्टेंबर । शाळा सुरू करण्याच्या उपक्रमाला शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी मूकसंमती दिली. पण, परिसरातील पालकांच्या सहकार्याशिवाय शाळा सुरू करणे शक्य नव्हते. सवारनी एकमताने शाळा सुरू करण्यास संमती दिली. सर्व जबाबदारी घेतली म्हणून हे यशस्वी 100 दिवस आज आपण साजरे करू शकलो, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

आदर्शगाव हिवरेबाजार येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे आनंदी 100 दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, घरघर लंगरचे हरजितसिंग वधवा, जनक आहुजा आदींसह ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थांनी उत्स्पुर्तपणे 100 दिवसांचे आपले अनुभव कथन केले. आमच्या बरोबरच राज्यातील इतरही मुलांच्या शाळा सुरु व्हाव्यात अशी इच्छा प्रकट केली.पालकांनी 100 दिवसांत अनेक अडचणी आल्या तरी स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देऊन सहकार्य केले.

‘त्या’ शंभर दिवसांचे पुस्तक होणार...
यशस्वी 100 दिवस या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेतली. त्याचे एक पुस्तक प्रकाशित करण्याचे पाहुण्यांनी सुचविले. त्याची सर्व आर्थिक जबाबदारी उद्योजक जनक आहुजा यांनी घेतली आणि त्याचा प्रकाशन सोहळा लवकरच हिवरेबाजार येथे घेण्यात येईल, असे घोषित केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post