दहा वर्षापासून फरार असलेला दरोडेखोर पकडला

। अहमदनगर । दि.06 सप्टेंबर ।   सोनई पोलीस ठाणे व जिल्ह्याबाहेरील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दरोडा, ड्रॉप, चोरी अशा दाखल गंभीर गुन्ह्यामध्ये सुमारे दहा वर्षापासून फरार असलेला आरोपी रामहरी जाफर काळे (वय 28, रा. पानसवाडी, ता. नेवासा) याला नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे केली.

याबाबतची माहिती अशी की सोनई पोलिसाना विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला व दहा वर्षापासून फरार असलेला आरोपी रामहरी काळे याच्या वास्तव्याबाबत सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्याचे गुन्ह्यांमधील बरेच वर्षापासून फरार असलेला रामहरी जाफर काळे हा पानसवाड़ी (ता. नेवासा) येथे त्याच्या राहात्या घरामागील डाळिंबाच्या बागेमध्ये दडून बसलेला आहे 

व छापा टाकल्यास तो मिळून येईल, या मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक कर्पे व सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व पोलिस कर्मचारी यांनी रात्री दहा वाजता पानसवाडी येथे अंधारामध्ये डाळिंबाच्या बागेस चोहोबाजूने वेढा घालून सापळा रचला व आरोपीचा टॉर्चच्या साह्याने शोध घेत असताना बागेमध्ये मध्यभागी अंधारात तो दडून बसलेला आढळून आला. त्याला पोलिसांची चाहुल लागल्याने त्याने बागेमधून पळ काढला. पण, पोलिसानी पाठलाग करुन त्यास शिताफीने बागेचे परिसरातच पकडून जेरबंद केले.  

त्याच्या नाव-पत्त्याची खात्री केली असता त्याने पकडल्यानंतर पोलिसांना त्याचे नाव रामहरी जाफर काळे असे सांगितले. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या विरुध्दचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून पाहिला असता, पोलीस ठाणे सोनई येथील सन 2012 व 2013 या दोन वर्षांमधील गंभीर स्वरुपाचे दरोडा, जबरी चोरी गुन्हयामध्ये गुन्हा केल्याच्या तारखेपासून पसार झालेला व पाहिजे असलेल्या आरोपींच्या अभिलेखावरील आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post