महावितरणची : 10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

महावितरणची कारवाई : 10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

7 लाख 29 हजार ग्राहकांकडे 855 कोटी रुपये थकबाकी

वीजबिले वेळेत  भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन     

। अहमदनगर । दि.06 सप्टेंबर । महावितरणच्या नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील   घरगुती, औदयोगिक,  वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या 7 लाख 29 हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास 855 कोटी 40 लाख रुपये थकबाकी असुन, यामध्ये अहमदनगर मंडळातील 3 लाख 18 हजार 685 ग्राहकांकडे 477 कोटी 16 लाख रुपये थकबाकी आहे.   महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने  ही थकबाकी वसूली करण्यासाठी  थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.

या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे  परिमंडलात ऑगस्ट 21 या महिन्यात  10 हजार 260 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून  सदर  ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह  पुनर्रजोडणी शुल्क  भरावे लागणार आहे.  त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग  टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या  नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.

अहमदनगर  मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण 2 लाख  78 हजार ग्राहकांकडे 55 कोटी  84 लाख,  वाणिज्यिक वर्गवारीतील 27 हजार 404 ग्राहंकांकडे 13 कोटी 39 लाख रुपये,औद्योगिक वर्गवारीतील 3 हजार 848 ग्राहकांकडे 3 कोटी  76 लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील 3 हजार 537 ग्राहकांकडे 342 कोटी 96 लाख, पाणीपुरवठा योजनेतील1 हजार 659 ग्राहकांकडे 58 कोटी 12 लाख,

यासह सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 4183 ग्राहकांकडे 3 कोटी 7लाख असे एकूण अहमदनगर मंडळात 3 लाख 18हजार 685 ग्राहकांकडे 477 कोटी 16 लाख रुपये थकबाकी आहे  तसेच नाशिक व मालेगाव  मंडळाअंतर्गत वरील सर्व वर्गवारीतील 4 लाख 10 हजार ग्राहकांकडे 377 कोटी रुपये थकबाकी आहे अशी एकूण  नाशिक परीमंडलात  एकूण 7 लाख 29 हजार  ग्राहकांकडे 855 कोटी 40 लाख रुपये  थकबाकी आहे.

दरमहा सातत्याने  पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून  सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहकाऩी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडीग़,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश  दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे  दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post