। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । नगर तालुक्यातील जामखेड रोडवरील आठवड येथील हॉटेल सार्थकमधील एका वेटरने दुसर्या वेटरचे हातपाय बांधून बेदम मारहाण करत त्याचा खून केला. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रथमदर्शी माहिती मिळाली.
कैलास घोडके (वय 55) असे मयत झालेल्या वेटरचे नाव असून संतोष तुळशीराम सुरदुरसे (रा.दर्यापूर, जि.अमरावती) असे आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेलचे मालक संजय नवनाथ खकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत व आरोपी हॉटेलमध्ये वेटर म्हणून सोबतच काम करत होते. या दोघांमध्ये सतत भांडण होत होते. सोमवारी रात्रीही भांडण होऊन दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी सुरदुसे यांनी कैलास यास मारहाण करत त्याचे हातपाय बांधून टाकले.
यातच कैलास याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.

Tags:
Crime