। अहमदनगर । दि.21 सप्टेंबर । महापालिकेने नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्याचे आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांना पत्र दिले आहे.
महापालिके मार्फत नगर शहरात सध्या आरोग्य केंद्रामध्ये लस देण्यात येत आहे. सध्या लसीचा पुरवठा मोठया प्रमाणात होत आहे. नागरिकांना आरोग्य केंद्रामध्ये येवून लस घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून लस घेणार्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी, कष्टकरी, नोकरदार,

मध्यमवर्गीय यांना लस घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ज्या पध्दतीने पल्स पोलिओची लस घरोघरी देण्यात येत होती, त्याच पध्दतीने घरोघरी जावून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करावे, अशी मागणी यात फुलसौंदर यांनी केली आहे.
Tags:
Ahmednagar