बाजार समितीत सोयाबीनची आवक : घिगे


। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर ।  दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार विभागात सोयाबीन शेतमालाची आवक सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार तीनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे, असे माहिती बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी दिली.

ते म्हणाले, की बाजार समितीचे मुख्य यार्डचे भुसार विभागामध्ये सोयाबीन शेतमालाची बुधवारी (दि.23) 500 से 600 डाग आवक झाली. त्यास जास्तीत जास्त बाजारभाव प्रति क्विंटल रुपये पाच हजार ते 6300 सरासरी मिळाला आहे.

तरी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करून आणावा जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांचे सोयाबीन या शेतमालास जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post