। अहमदनगर । दि.07 सप्टेंबर । येथे चिकनचे दुकान का टाकले असे म्हणून शिवीगाळ करीत दोघांना डोक्यात, पाठीवर, मानेवर वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की चंद्रकांत प्रकाश साबळे (वय 21, राहणार माहीजळगाव, कर्जत) यांनी पाटेगाव येथे चिकनचे दुकान टाकले होते. याचा राग येऊन अक्षय प्रभाकर डाडर व समाधान सर्जेराव डाडर (दोघे राहणार पाटेगाव, कर्जत) हे दारू पिऊन चंद्रकांत साबळे यांच्या दुकानात आले आणि तुम्ही येथे चिकनचे दुकान का टाकले, असे म्हणून शिवीगाळ केली.
अक्षय डाडर याने चंद्रकांत साबळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तर समाधान डाडर याने संदीप साबळे यांच्या पाठीवर, मानेवर, कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करीत आहे.
Tags:
Crime
