नामदेव राऊतांचा राष्ट्रवादीत प्रवेश

। मुंबई । दि.23 सप्टेंबर । कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक असलेले कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. राऊतांनी अखेर जिल्हयातील चर्चेला पुर्णविराम दिला असून राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी हाती घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, रजाक झारेकरी, प्रसाद ढोकरीकर, सुभाष गुगळे, नितीन बांडे, लालासाहेब शेळके, रवी पाटील, नितीन तोरडमल आदी उपस्थत होते.

कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, हर्षदा काळदाते, अमृत काळदाते, उषा समुद्र, इरफान सय्यद, रामदास हजारे, बजरंग कदम, दीपक ननवरे, महादेव खंदारे इन्सूस पठाण, मंगेश नेवसे, धनंजय थोरात आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राऊत यांचा राष्ट्रवादी प्रवेश माजी मंत्री शिंदे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. प्रसाद ढोकरीकर यांच्यानंतर राऊत यांनीही भाजपची साथ सोडल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम झाले आहे. आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.


अनेक दिवसांची चर्चेला फुलस्टॉप
कर्जत जामखेड मतदारसंघात आ.रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ केली असून माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे समर्थक असलेले कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. गेल्या आठ दिवसांपासून राऊत कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, अनेकांनी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आज या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post