राज्यातील अशंत अनुदानीत शाळा तुकड्यांचे वेतन नॉन प्लॅन करावे जिल्हाध्यक्ष : प्रसाद शिंदे

। अहमदनगर । दि.27 सप्टेंबर । महाराष्ट्रातील अशंत अनुदानीत शाळा,तुकड्यांचे खासगी प्राथमिक ,माध्यमिक शाळांचे वेतन प्लॅन मधुन होत आहे.त्यासाठी दर वेळेस  निधी मंजूर करावा लागतो.प्रसंगी वेतनासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने अशंत अनुदानित शिक्षकांना मिळणारा पगार अत्यल्प त्यातही निधी अभावी दोन,तीन महिने पगार होत नाही. अशंता अनुदानित शिक्षकही सर्व शैक्षणिक कामे करतात.परंतु पगारा अभावी शिक्षकांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे.

मुलांचे शिक्षण ,कौटुंबिक जबाबदारी या पूर्ण करण्यासाठी शिक्षक पूर्ण पणे पगारावरच अवलंबून आहे. या संदर्भात स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे की आपण शिक्षकांच्या भावना समजावून घ्याव्यात.आणि अशंत अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक शाळा,तुकड्यांचे वेतन नॉन प्लॅन या शिर्षकाखाली करण्यासाठी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून आदेश निर्गमित करावा आणि लाखो शिक्षकांना न्याय द्यावा.

या प्रसंगी स्वाभिमानी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी सांगितले की शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शिक्षकांच्या या भावना संघटनेच्या माध्यमातून मा.ना.शालेय शिक्षणमंत्री यांच्या समोर मांडून लवकरच त्यावर मार्ग काढण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक संघटना म.रा .संस्थापक के,पी पाटील सर,महासचिव ज्ञानेश चव्हाण ,राज्य महिला आघाडीप्रमुख नेहाताई गवळी,व सर्व राज्य कार्यकारीणी जिल्हा कार्यकारीणी सदस्य यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post