नगर तालुका पोलिसांची कामगिरी

चास शिवारात 6 लाख 70 हजार किंमतीचे गोमांस टेम्पोसह पकडले : नगर तालुका पोलिसांची कामगिरी


। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । महाराष्ट्र शासनाची गोमास विक्री व वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना बेकायदेशीररित्या गोमांस वाहतूक करणारा टेम्पो नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून पकडला ही कारवाई नगर पूना रोड वरील कामरगाव शिवारात केली.

याबाबतची माहिती अशी की नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना नगर तालुका पोलिस ठाण्याचेपोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना एक संशयित टेम्पो जात असताना आढळला त्यांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला तत्पूर्वी तो टेम्पो पुणे-अहमदनगर महामार्गाने कामरगाव-चास शिवारामध्ये पोहोचला होता.

त्या टेम्पो मध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे गोवंशीय जनावराचे मांस व महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी गाडी किंमत चार लाख किमतीची असा एकूण सहा लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी टेम्पो चालक किरण पांडुरंग कुंभार (रा.शिंदेवाडी देशमुख वाडी ता माळशिरस जिल्हा सोलापूर ) याच्याकडे चौकशी केली असता तो प्रथम त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन लागला.

परंतु नगर तालुका पोलिस निरीक्षक सानप यांनी त्याला अधिक विश्वास मध्ये घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरचे गोमास नगर शहरांमधील अरबाज गुलाम रसूल कुरेशी  ( राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट ता जि अहमदनगर ) यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले यावरुन विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा विधेयक 1995 चे कलम 5 (क) 4 चे उल्लंघन 8 व 9, 9 (अ) प्रमाणे वगैरे मजकुराचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 टेम्पो चालक व गोमास मालक यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार इथापे  व पोलिस नाईक धर्मराज  दहिफळे व यांनी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post