मैत्रीच्या वादातून झाला विकासचा खून : केडगाव बायपास रोडवरील प्रकरणाचा उलगडा, आरोपीला पकडल

। अहमदनगर । दि.02 सप्टेंबर ।  चालक असलेल्या दोन मित्रांतील अंतर्गत वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एकाच्या मारहाणीत दुसर्‍याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला असून, आरोपीला अटक केली आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिताफीने अटक करून नगर तालुका पोलिसांनी छडा लावला. याबाबतची माहिती अशी की, केडगाव-अरणगाव बायपास रोड रेल्वे ब्रीजजवळ अनोळखी व्यक्तीचा (ड्रायव्हरचा) खून करणार्‍या आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासाच शिताफीने अटक केली.

त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक. हल्ली राहणार अरणगाव, ता.नगर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की दि. 25 ऑगस्ट रोजी केडगाव-अरणगाव बायपास रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. त्याचे शवविच्छेदन केले असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने पाठीत मारल्यामुळे व फुप्फुसास सूज आल्याने तो मरण पावला, अशी माहिती मिळाली.

ही घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचा त्वरित शोध लावण्याचा आदेश दिला होता. ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त कले होते. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
ओळख पटवून माहिती मिळवली : 

 नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी मृत झालेला व्यक्तीची ओळख पटवून त्याचा नातेवाईकांच्या माध्यमातून विविध माहिती हस्तगत केली होती. या घटनेमधील आरोपी मिनीनाथ व मृत विकास यांचे मैत्रीचे संबंध होते. हे दोघेजण एका खासगी ठिकाणी चालक म्हणून कामाला होते. या दोघांमध्ये अंतर्गत वाद झाल्यामुळे विकास याला मिनीनाथने लाकडी दांड्याने मारहाण केली होती, या मारहाणीमध्ये विकासाचा मृत्यू झाला. मारहाण इतकी जबर करण्यात आली होती की विकास याचा चेहरा दिसून येत नव्हता. 

मृताची ओळख पटवण्यासाठी सर्व जिल्ह्यामधे तसेच इतर जिल्ह्यामध्ये संदेश देण्यात आलेला होता. तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने मृत व्यक्तीची ओळख पटवली गेली. त्याचे नाव विकास महादेव कदम (वय 40 वर्षे, सध्या रा. वैष्णवी नगर, केडगाव, अहमदनगर) असे आहे.

गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे हा गुन्हा करणारा आरोपी हा मृत विकाससोबत ड्रायव्हींगचे काम करीत होता, असे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनांक दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याचे जमादार पठाण, पोलिस हवालदार रमेश गांगर्डे, रावसाहेब खेडकर, पोलिस नाईक सोनवणे, धर्मराज दहिफळे, रवि सोनटक्के, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खिळे, प्रशांत राठोड, जयदत्त बांगर चालक जमादार घोरपडे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post