याबाबतची अधिक माहिती अशी की, गोरक्ष दादाराम गारुडकर (वय 41, राहणार पितळे कॉलनी, नागापूर, एमआयडीसी अ.नगर) यांच्या घरात लगतच सावता किराणा नावाचे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातच असलेल्या घरात प्रवेश केला.
किराणा दुकानातील गल्ल्यामधून दोन हजार रुपये काढून घेतले व घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून आतील पंचवीस हजार रुपये व दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर शेजारी राहत असलेले भाडेकरू भूषण भागचंद भिंगारदिवे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश आत केला व आतील सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील कपाटातील 35 हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली.
त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या सिनारे हॉस्पिटल येथील हिरा मेडिकल स्टोअर या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक केली. काउंटरमधील तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी गोरक्ष गारुडकर यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक पाठक करीत आहे.
