पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात आता नितीन गडकरींना पंकजा मुंडे लिहिणार पत्र

 । मुंबई । दि.19 सप्टेंबर । राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर ‘लेटरबॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता रस्त्यांच्याच मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पत्र लिहिणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे.

पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे गडकरी-मुंडे यांच्यातील महामार्गाच्याच विषयावरून होणारा पत्रप्रपंचही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्या सक्रिय बनल्या आहेत. त्यांनी आज ट्वीट करून पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भेगचा फोटो शेअर केला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या पत्रात नेमके काय म्हणणे मांडताहेत, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार आहे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. रस्त्याच्या बांधकामात झालेली चूक गडकरी यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत...माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच  त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही... तात्काळ दखल घेतली जाईल... असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी  ट्वीट  करत व्यक्त केला आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post