। अहमदनगर । दि.21 सप्टेंबर । राहता येथील बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या पाच हजार गोण्यांची आवक झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला भाव कमी मिळाल्याने शेतकरी चिंतेत होता या आठवड्यात चांगला भाव कांद्याला मिळाला आहे.
राहाता बाजार समितीत पाच हजार 193 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2100 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 1600 ते 2100, दोन नंबर कांदा : 1100 ते 1500, तीन नंबर कांदा : 500 ते 1000, गोल्टी कांदा : 1100 ते 1300, जोड कांदा : 100 ते 400.कांद्याच्या भावात आज वाढ झालेली आहे. कालच्या तुलनेत आज सुमारे 300 रुपयांची वाढ झाली आहे.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी खूश झालेले आहेत. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकर्यांना लागली होती. मागील बाजारभावापेक्षा भाव जास्त मिळालाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Tags:
Ahmednagar
