। नवी दिल्ली । दि.06 सप्टेंबर । अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटनेने आंदोलन करूनही केंद्र सरकारने शेतीविरोधी तीन कृषी कायदे रद्द केलेले नाहीत. त्यामुळे आता शेकडो शेतकऱ्यांनी आणखी आक्रमक झाले असून रविवारी घेतलेल्या महापंचायतीत संयुक्त किसान मोर्च्याने 27 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक दिली. तसेच देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक महिन्याला महापंचायत घेण्याचे ठरवले आहे.कें
केंद्र सरकारने अदानी, अंबानीला देश विकायला काढला आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना देण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी हे कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटायचे नाही. दिल्लीचे तख्त हलविले, उत्तर प्रदेशचे सरकार उलथवून टाकूयात, असा पुकारा या महापंचायतीत करण्यात आला. याला शेकडो शेतकऱ्यांनी एकमुखीने पाठिंबा दिला. शेतकरी नेते वीरेंद्र सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी त्यांना निवडणुकीत हरवावे लागेल. त्याची सुरवात उत्तर प्रदेशमधून करू. येत्या निवडणुकीत योगी सरकारला धूळ चारू.
योगेंद्र यादव म्हणाले की, 5 वर्षांत योगीने पाच पापं केली आहेत. कर्जमाफीच्या नावाखाली ढोंग , हा योगी नाही ढोंगी आहे. गेल्या चार वर्षांत उसाचा भाव वाढविला नाही. शेतकऱ्यांच्या बिलांची थकबाकी मिळाली नाही. योगी नाही , हा लुटेरा आहे. हे सरकार जुमलेबाज आहे. मोदी सरकारने पीक विम्याचे आश्वासन दिले. यूपीमध्ये गेल्यावर्षी 72 लाख शेतकऱ्यांचा विमा होता, आता 47 लाख लोकांचा विमा आहे. ही फसवणूक असल्याचे योगेंद्र यादव यांनी सागितले.
Tags:
Maharashtra
