। अहमदनगर । दि.09 जून । घरातील सर्व झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील अंगणातील रूमच्या दरवाजाची कडी उघडी असल्याचा फायदा घेऊन घरामध्ये प्रवेश केला.आतील सामानाची ऊचका पाचक केली. घरातील सुमारे एक लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील बागरोजा हडको परिसरामध्ये घडली.
या बाबतची माहिती अशी की विनोद छगनराव काकडे ( वय 43 रा. रेणाविकर कॉलनी, साताळकर हॉस्पिटल शेजारी बागरोजा हाडको) हे बागरोजा हडको ठिकाणी कुटुंबासह एकत्र राहत आहे. (सोमवारी दि.7) रात्री घरातील सर्वाचे जेवण झाले. त्यामुळे घरातील सर्वजण घराचे वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले. खाली मजल्यावर असलेले हॉल मध्ये काकडे यांची आई एकटी झोपली होती.
मंगळवारी ( दि.08 ) रोजी 04/45 वाजता मुलासऔषध देण्या करीता काकडे हे बेडरूम मधुन खाली किचन मध्ये पाणी आण्यासाठी गेले असता हॉल मध्ये त्यांची आई झोपलेली होती. काकडे हे किचन मध्ये गेले असता त्यांना घराचे मागील बाजूस असलेला बाहेर जाण्याचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा त्याच वेळी दिसले की, मागील बाजूस ठेवलेले लोखंडी कपाटाचे दारवाजे उघडे आहेत.
त्यामधील सामान अस्ताव्यस्त खाली पडलेले होते. तेव्हा लक्षात आले की, मागील दरवाजातून कोणीतरी आत प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली आहे. आईने चुकुन मागील बाजुचा दरवाजा बंद केला नव्हता त्यानंतर घरातील सर्वाँना झालेला प्रकार सांगितला व खाली किचन मध्ये येवून पाहणी केली असता मागील अंगणातील रूम मधील लोखंडी कपाट व किचन मध्ये ठेवले लाकडी कपाट उघडे दिसले.
त्याची उचकापाचक केलेली दिसली. तेव्हा कपाटाची पाहणी केली असता किचन मधील लाकडी कपाटाचे ड्रॅवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले असल्याचे दिसून आले. यामध्ये 87,हजार रूपये किमतीची सोन्याची गळयातील चैन , बारा,हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी, 38,हजार रूपये रोख रक्कम त्यामध्ये विविध दराचे नोटा असा एकूण 1 लाख 37,हजार रूपये किमतीचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी विनोद काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे हे करीत आहेत.
