केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी शस्रासह पकडली

। अहमदनगर । दि.14 जून । घातक शस्त्राचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहाजणांची टोळी कोतवाली पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रासह दोन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील हॉटेल सचिनजवळ केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की कोतवाली पोलिसांची हद्दीत गस्त सुरू असताना नगर-पुणे रोडवरील हॉटेल सचिनजवळ अंधारात काही व्यक्ती संशयितरित्या वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

 पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यांची नावे सोनू सुधाकर भालेराव (राहणार पंचशीलनगर, रेल्वे स्टेशन, अहमदनगर), अनुज सुधाकर उमाप (राहणार ताराबाग कॉलनी, केडगाव), रोहन सत्यवान शिंदे (रेल्वे स्टेशन), कुणाल सुधाकर भालेराव (राहणार पंचशील नगर, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) यांच्यासह दोन अल्पवयीन मुले (राहणार केडगाव) यांना ताब्यात घेतले. 

 त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, लोखंडी गज, मिरची पूड तसेच दोन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हेमंत भंगाळे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गे, पोलिस नाईक जाधव, टिपरे, मेटे, काळे यांनी केली आहे.हे.

Post a Comment

Previous Post Next Post