आज ३२६ रूग्णांना डिस्चार्ज तर किती नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर...वाचा सविस्तर ...


आज ३२६  रूग्णांना डिस्चार्ज तर 

 नव्या ४८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के


। अहमदनगर । दि.14 जून । जिल्ह्यात आज ३२६ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६४ हजार ३६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत  ४८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ९९३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५९ आणि अँटीजेन चाचणीत २०६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३ आणि  संगमनेर १३, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०६, जामखेड २५, कर्जत ०३, कोपरगाव ०८, नगर ग्रा.०७,  नेवासा २१,  पारनेर ३०, पाथर्डी १२, राहाता ०७,  राहुरी ३५, संगमनेर १४, शेवगाव २९, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१  आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०६ जण बाधित आढळुन आले. अकोले १५,  जामखेड ०३, कर्जत ३६, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ०१, नेवासा १७, पारनेर ०७, पाथर्डी २७,  राहाता ०६, राहुरी २४, संगमनेर ११, शेवगाव १७, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २७, अकोले ०५, जामखेड ३२, कर्जत १४, नगर ग्रामीण ११, नेवासा २९, पारनेर ४२, पाथर्डी ३५, संगमनेर २३,  शेवगाव ६०,  श्रीगोंदा २१ आणि श्रीरामपूर २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : २,६४,३६०

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ३९९३

*पोर्टलवरील मृत्यू नोंद : ४६५२

*एकूण रूग्ण संख्या : २,७३,००५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १४ जून, २०२१

 
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

Post a Comment

Previous Post Next Post